Breaking News

एक कोटीच्या मोबदल्यात शासन आदेशाची होळी

मुंबई/ विशेष प्रतिनिधी। 11 : सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार मंत्रालयातून चालतो की, मुंबई साबां मंडळाच्या अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांच्या दालनातून? असा प्रश्‍न मध्य मुंबई साबां विभागाच्या एका प्रकरणाने चव्हाट्यावर आणला आहे. अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी या प्रकरणात शासनाचे निर्वाणीचे आदेश धाब्यावर तर बसवलेच शिवाय पुर्वीच्या आदेशात बदल करून स्व-अधिकारात हेतुप्रणित आदेश काढून महाराष्ट्र सेवा नियमांचा भंग केला आहे. अधिक्षक अभियंता यांची ही कृती साबां मंत्रालय, साबांचे प्रधान सचिव, बांधकाम सचिव, महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी, मुख्य अभियंता या सर्वांच्या अधिकाराला आव्हान देणारी ठरली आहे.
मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरळी उपविभागातील अपहार प्रकरणात दोषी ठरलेले तत्कालीन कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील आणि अन्य सहअभियंता यांच्या विरूध्द फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाले होते. या आदेशाचे पिंडदान करून अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी गुन्हे दाखल तर केले नाहीतच शिवाय मुळ आदेशात फेरफार करून निवृत्त झालेले कार्यकरी अभियंता ए. जे. पाटील आणि भादुर्गे या दोघांवर कारवाई प्रस्तावित केली.
आ. चरणभाऊ वाघमारे आणि आ. प्रशांत बंब या दोन्ही सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून या प्रकरणाची चौकशी लावली होती. तथापी चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या सर्व तत्कालीन अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र 13 मार्च ते 18 मार्च या कालावधीत अरविंद सुर्यवंशी मध्य मुंबई साबां विभागाच्या वरळी उपविभागात मुक्काम ठोकून तब्बल एक कोटीची तडजोड करून शासनाच्या आदेशाचा भंग केला.नव्याने स्वतःच्या अधिकारात आदेश काढून  वरिष्ठांच्या अधिकाराला आव्हान दिले. हे एकूण प्रकरण अतिशय रंजक आणि भयंकर असून सार्वजनिक बांधकाम विभागासाठी एक कोडे बनले आहे. हे कोडे सोडविण्याचा प्रयत्न करू या उद्याच्या अंकात. (क्रमशः)
हायब्रीड अ‍ॅन्यूटीच्या बारशाला
23 हजार कोटीची बिदागी
भ्रष्टाचाराच्या दक्षिणेवर उपजिविका करणारे बांधकाम सचिव सी. पी. जोशी, लवासातून हाकललेला आचार्य, मराठवाड्यातील भ्रष्टाचार अपचन झाल्यानंतर तोंड लपवत फिरणारे धोंडगे आणि चंद्रकांत दादांसोबत सावलीसारखे वावरूनही प्रतिष्ठेला दंश करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या चौकडीच्या अभद्र युतीचा कारनामा... 23 हजार कोटीचा रस्ते घोटाळा...
असंगाशी संग झाला तर उत्पत्ती सदोषच निपजणार हा निसर्ग नियम आहे. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत वचन म्हणूनच अनन्य ठरले आहे. बुध्दी भ्रष्ट झाली की वर्तनही भ्रष्ट होते. संपत्तीचा सोस बुध्दी भ्रष्टतेचे प्रमुख कारण आहे, हाच हव्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अभियंत्याच्या बुध्दी भ्रष्टतेला कारणीभूत ठरला असून बुध्दीभ्रष्ट अभियंत्यांचे वर्तनही भ्रष्ट बनले आहे. याच भ्रष्ट बीजाला पोसले गेल्याने सार्वजनिक विभागात भ्रष्टाचाराला मांडीवर खेळवणारे नवे बाळ जन्माला घातले गेले आहे.
हायब्रीड अ‍ॅन्यूटी... या बाळाच्या बारशालाच तब्बल 23 हजार कोटीच्या गैरव्यवहाराची अंगाई गायीली गेली आहे. या बारसे सोहळ्याचे मानकरी आहेत, अर्थातच बांधकाम सचिव सी. पी. जोशी, कधीकाळी जामीनासाठी पार्श्‍वभागाला पाय लावून पळणारे धोंडगे आणि झाल पळवणारा, लवासातून हुसकावून लावलेला नेटकरी शाखा अभियंता आचार्य. विशेष म्हणजे बांधकाम मंत्र्यांची सावली म्हणून स्वतःला प्रमोट करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव हे देखील या बारशाच्या समारंभाचे प्रमुख निमंत्रक आहेत. या निमंत्रकांची सातारा एसटी आगार प्रमुख म्हणून कार्यरत असतांना झालेला भरती घोटाळा ते निवृत्तीपर्यंत आणि निवृत्तीनंतर दादांचे खासगी सचिव म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यापासून आज पर्यंतची साबांतीला कर्मकुंडली दररोज तपशीलात...

  सीपी जोशींच्या खुलाशाचा अर्थ काय?
  सी.पी.जोशी आणि आचार्य यांच्यांत झालेला गुप्त समझोता
  आचार्यला साबां मंत्र्याच्या दालनात वरिष्ठ अभियंत्यांची बैठक बोलविण्याचा अधिकार कुणी दिला?
  सी.पी.जोशी यांची संशयास्पद भुमिका आणि 23 हजार कोटीचा रस्ते घोटाळा
  सी.पी.जोशींची नार्को टेस्ट का ठरली आवश्यक
  अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी साबांचे सर्वाधिकारी
   आहेत का?
  शासनाचे आदेश डावलून स्वअधिकारात नवे बेकायदेशीर
   आदेश काढण्यामागे अधिक्षक अभियंता सुर्यवंशींचे
   अर्थकारण काय?
  13 मार्च ते 18 मार्च या सात दिवसात वरळी मुक्कामी नक्की
   काय शिजले?
  पाचव्या माळ्यावर चामलवार-सुर्यवंशींच्या बैठकीचे मिनीट्स
  प्रधान सचिवांना का घ्यावी लागली बैठक?
  सात दिवसांच्या वरळी मुक्कामी झालेल्या एक कोटीच्या
   डिलींगचे गौडबंगाल काय?