नाशिक शहरात घरफोड्यांचा हैदोस
नाशिक, दि. 10 एप्रिल - उन्हाळ्याच्या सुटीत बाहेरगावी जाणार्या नागरिकांच्या घरांवर डोळा ठेवून घरफोडी करणारे चोरटे सुट्यांपुर्वीच सक्रिय झाले आहेत. शहरातील उपनगर, अंबड व नाशिकरोड या विविध परिसरातील तीन ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोन्याचे दागिने, रोख रक्कम व हॉस्पिटलमधील ऑटो रिफॅक्टोमीटरही चोरट्यांनी चोरून नेले आहेत़ उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग वाढवून पोलिसांनी घरफोड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
गणेश चंद्रकात डबे (श्री गणेश बंगला, हरीओमनगर, आर्टिलरी सेंटर रोड, नाशिकरोड) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सदर व्यक्ति कुटुंबासह बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घराच्या बेडरुममधील लाकडी कपाटातून हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले़. चोरून नेलेल्या दागिन्यांमध्ये दोन नाणे, पंधरा ग्रॅम वजनाची चांदीची तोरडी, चांदीचे नाणी, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स व रोख रकमेचा समावेश आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना सिडकोतील शिवपुरी चौकात घडली़ प्रकाश बागूल (शिवपूरी चौक, अतुल डेअरीच्या मागे, उत्तमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी त्यांचा तसेच त्यांच्या घराशेजारी राहणारे संदीप आहेर यांच्या घराच्या दरवाजाचा लोखंडी कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला. तसेच घरातून सोन्याचे मंगळसूत्र, दोन सोन्याच्या अंगठ्या, एलसीडी टीव्ही, मोबाईल व बारा हजार रुपयांची रोकड असा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना बिटको परिसरातील घडली असून चोरट्यांनी चक्क हॉस्पिटलमधून महागडे अॅटो रिफॅक्टोमीटर चोरून नेले आहे. युवराज भांगरे (गुरुवैभव अपार्टमेंट, गुलमोहर कॉलनी, आनंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांनी त्यांच्या बिटको चौकातील डॉ. भांगरे रुग्णालयाच्या दरवाजाच्या लॅचचे कुलूप तोडून रुग्णालयात प्रवेश केला. तसेच रुग्णालयातील डोळ्यांची तपासणी करण्यासाठी लागणारे अॅटो रिफॅक्टो मीटर चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.