ऐलमा पैलमा...तर्फे 15 रोजी आगळावेगळा प्रकाशन सोहळा
सिंधुदुर्गनगरी, दि. 10 एप्रिल - ऐलमा पैलमा अक्षर देवा सिंधुदुर्ग या महिला साहित्यिक समूहाच्या वतीने रविवार, 15 एप्रिल रोजी एका आगळ्या वेगळ्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कणकवली येथील मराठा समाज सभागृहात सकाळी 11 वाजता सुजाण कवयित्री दिशा पिंकी शेख यांचा हस्ते वैशाली पंडित यांच्या पाच दशक नऊ सुटे या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन होणार आहे.
ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूह हा गेली चार वर्षे विविध साहित्यिक आणि सामाजिक उपक्रमातून वाड़मयीन जाणीव विकसित करीत आला आहे. रुजवण हे या समूहाचे प्रतिक आहे. प्रत्तेक उपक्रमातून नवनवीन विचारंचे रुजवण घालणे आणि त्यानंतर त्याचे संवर्धन करणे हा त्यामागील हेतू आहे. हीच भूमिका घेऊन एक आगळे वेगळे पुस्तक प्रकाशन या समूहाच्या वतीने करण्यात येणार आहे.
पाच दशक नऊ सुटे या वैशाली पंडित लिखित ललितलेख संग्रहाचे प्रकाशन एक संवेदनशील आणि प्रखर समाजभान असणार्या सुजन कवयित्री दिशा पिंकी शेख यांच्या हस्ते 15 एप्रिलला सकाळी 11 वाजता कणकवलीच्या मराठा समाज सभागृहात होणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष आणि झपूर्झा या मुखपत्राच्या साक्षेपी संपादक नमिता कीर या प्रकाशित पुस्तकाचा परिचय करून देणार आहेत.
दिशा पिंकी शेख या तृतीयपंथी म्हणून ओळखल्या जाणार्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या समाजातल्या व्यक्तीना मानून म्हणून ओळख मिळावी म्हणून त्या समाजप्रबोधनाचे काम अत्यंत तळमळीने करत आहे. या व्यक्तींच्या जगण्याचा हक्क देणे हे आपणा त्यांच्यावर मेहरबानी करणार नसून आपण त्यांच्यासह समाजजीवन जगणे हि काळाची गरज आहे, अशा प्रतिक्रिया त्यांचे लिंगभानविषयक भाषण ऐकल्यावर नव्या पिढीकडून येतात. अशा प्रबोधनाची निर्मळगंगा घेऊन दिशा पिंकी शेख सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.
दिशा पिंकी शेख यांना ’आम्ही तुमच्याबरोबर आहोत’ हा दिलासा सार्या सिंधुदुर्गवासियांनी एक दिलाने देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन या साहित्य समूहातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आरती कार्लेकर (9422434328) किंवा संपदा प्रभुदेसाई (9404859885) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ऐलमा पैलम अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.