विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू
कर्जत/प्रतिनिधी।22:
नगर
सोलापूर महामार्गावरील पाटेवाडी-निमगाव डाकू शिवारात रविवारी पहाटे
चारच्या सुमारास स्कॉर्पियो आणि माल ट्रक यांच्यात भीषण अपघात घडला. या
अपघातामध्ये स्का ॅर्पियोमधील पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर एक 16
वर्षांचा मुलगा या अपघातातून बचावला आहे.
पोलिस सूत्रांकडून
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नगर-सोलापूर
महामार्गावर पाटेवाडी शिवारात ट्रक आणि स्कार्पिओचा भीषण अपघात झाला.
स्कॉर्पिओ गाडी क्र (एम एच 12- झेड 2953) पंढरपूर येथून देवदर्शन आटपून
नेवासाकडे निघाले असता, मालट्रक क्र (एपी-02 टीए-7929) सोलापूरच्या दिशेने
जात होता. समोरासमोर झालेल्या धडकेत स्कार्पिओ वाहनातील 5 जण जागीच ठार
झाले. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
द्रौपदाबाई भाऊसाहेब
कातोरे, रमेश भाऊसाहेब कातोरे, दगडू भणगे (सर्व राहणार खरवंडी ता. नेवासा)
गाडी चालक हनुमंत डुचे (रा. जामखेड) तर, सत्यम कातोरे हा 16 वर्षीय मुलगा
गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जामखेड येथील स्थानिक रुग्नालयात उपचार
सुरू आहेत.
मयत रमेश कातोरे हे माध्यमिक शिक्षक असून माळवदे हे
मुख्याध्यापक असल्याची माहिती समजली आहे. रमेश कातोरे यांच्या आई या
पंढरपुर येथे वारीकरीता गेल्या होत्या. त्याना पंढरपुर येथे हृदयविकाराचा
त्रास झाला म्हणून त्यांना गावाकडे घेऊन जाण्यासाठी हे सर्व आले होते.
मात्र गावाकडे परत येत असताना काळाने त्यांना रस्त्यातच गाठले. या
अपघातामुळे नगर-सोलापुर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली होती.