रवि माने खून प्रकरणी फरारी आरोपीस अटक
सांगली, दि. 29, डिसेंबर - सांगली शहरातील कुख्यात गुन्हेगार रवि माने याच्या खूनप्रकरणी गत आठ महिन्यापासून फरारी असलेल्या आरोपीस गुंड विरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने अटक केली.
सनी दरिकांत कांबळे (रा. संजयनगर) असे या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार मेघराज रूपनर, महेश आवळे, सचिन कुंभार, सागर लवटे, राजेश पाटील, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे व किरण खोत यांच्या पोलीस पथकाने केली.
पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा व अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी सांगली जिल्ह्यातील फरारी गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या अटकेचे आदेश गुंड विरोधी पथकाला दिले होते. या आदेशानुसार संतोष डोके यांच्या नेतृत्वाखाली पथक कार्यरत होते.

Post Comment