Breaking News

लोणी व्यंकनाथमध्ये एका वृद्धास मारहाण

 
वृद्धाच्या सुन, नातवास जीवे मारण्याचा प्रयत्न

श्रीगोंदा / प्रतिनिधी । 18
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ या ठिकाणी वृद्धाला मारहाण करत असताना, तो वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करणार्‍या त्या वृद्धाच्या सून आणि नातवाला जबर मारहाण करत शेततळ्याच्या पाण्यात ढकलून देत, वरून दगडाने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. 13  जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता घडली असून, या घटनेबाबत  वृद्धाचा मुलगा सुनील खेडकर यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण उर्फ पप्पू शामराव भोसले याचेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून, श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासात आरोपीला जेरबंद केले. सदर घटना दि. 13 रोजी दुपारी साडेचार वाजन्याच्या सुमारास घडली असली तरी, आरोपीची त्या भागात असलेल्या दहशतीमुळे फिर्यादी सुनील खेडकर यांनी भीतीपोटी तेंव्हा फिर्याद न देता मंगळवारी  याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यामुळे, आज आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेे. 
दि. 13 रोजी फिर्यादी सुनील खेडकर हे लोणी व्यंकनाथ शिवारातील त्याच्या शेतात इतर कामगारासोबत काम करत असताना, त्याच्या शेजारी आरोपी प्रवीण उर्फ पप्पू शामराव भोसले याची शेतजमीन आहे. दुपारी साडेचार वाजन्याच्या वेळस आरोपी भोसले याच्या शेतजमीकडून मोठ्याने आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्यामुळे, सुनील खेडकर, त्याचा पुतन्या जयदीप खेडकर व मुलगा महेश खेडकर हे आवाजाच्या दिशेने शेततळ्याकडे धावले. तेथे गेल्यावर त्यांना शेततळ्यात सुनिल यांच्या पत्नी मंगल खेडकर आणि मुलगा मंगेश हे शेततळ्याच्या पाण्यात पडलेले दिसले. त्यामुळे या तिघांनी शेत तळ्यात उड्या टाकून त्यांना प्रथम बाहेर काढले, आणि शेजारीच  सुनील यांचे वडील रामदास खेडकर यांनाही आरोपीने मारहाण केल्यामुळे तेही त्याच ठिकाणी जखमी अवस्थेत  पडलेले होते. पत्नी व मुलगा घाबरलेले असल्यामुळे ते काहीच बोलत नव्हते, मात्र काही वेळाने त्यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, आरोपी प्रवीण भोसले याने रामदास खेडकर यांना मारहाण करत असताना त्यांचा वाद सोडविण्यासाठी आम्ही गेलो असता, भोसले याने आम्हाला लाथा बुक्क्याने जबर मारहाण करून, शेत तळ्यात फेकून दिले. आम्ही पाण्यात बुडून मरावे या हेतूने वरून तो आम्हाला दगडाने मारहाण करत असल्याचे त्यांनी सांगितले. योग्यवेळी सुनील खेडकर त्यांचा मुलगा व पुतण्या हे घटनास्थळी पोहचले नसते तर, मोठी दुर्घटना घडली असती. आरोपी हा टारगट वृत्तीचा असून, नशेबाज आहे, त्याने काहीही एक कारण नसताना फिर्यादीचे वडील रामदास खेडकर यांना जबर मारहाण करीत, फिर्यादीची पत्नी आणि मुलगा यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी फिर्यादी सुनील खेडकर यांनी आरोपी प्रवीण उर्फ पप्पू शामराव भोसले याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.