Breaking News

भीषण अपघातात 17 मजूर ठार

खंडाळाच्या खंबाटकी घाटात अपघात 

पुणे, दि. 11, एप्रिल -  पुणे-सातारा महामार्गावर खंडाळा येथे मजूराच्या टेम्पोला अपघात झाला. या अपघातात कर्नाटकातील 17 मजूर ठार झाले असून 11 जण जखमी झाले आहेत. कर्नाटकमधून मजूर घेऊन हा टेम्पो शिरवळ एमआयडीसीमध्ये चालला होता. यावेळी खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर टेम्पो वळणावर पलटी झाला. मृतामध्ये 4 महिला, 12 पुरुष आणि एक लहान मुल याचा समावेश आहे. या अपघाताची मिळालेली माहिती अशी, की सातारा जिल्ह्यातील महामार्गावरील खंडाळाच्या खंबाटकी बोगद्यात मंगळवारी पहाटे एस कॉर्नर येथे ट्रकला भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार सुमारे 13 जण जागीच ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृत सर्व विजापूर जिल्ह्यातील कामगार असून अंधार असल्याने नेमकी माहिती समोर येत नाही. दरम्यान, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. मंगळवारी पहाटे खंबाटकी बोगद्यात पुण्याच्या दिशेने सुमारे 30 कामगार घेऊन ट्रक निघाला होता. ट्रक एस कॉर्नर येथे आल्यानंतर कठड्याला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती पोलिसांना समजल्यावर त्यांनी व परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. युद्धपातळीवर ट्रकमधील जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू असताना प्राथमिक माहितीनुसार जागीच 13 जणांचा तर उपचारावेळी 4 अशाप्रकारे एकूण 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
सर्व मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अपघातस्थळी रक्ताचा सडा आणि मासाचे तुकडे विखुरलेले होते. लहान मुलांचे पडलेले मृतदेह बघून अनेकांची मने हेलावून टाकत होते. यापूर्वी याच एस धोकादायक वळणावर 100 च्यावर बळी गेले आहेत. तरी जिल्हा प्रशासनास जग येत नाही. कुंभकर्णी झोपेतील रस्ते विकास महामंडळ आणखी किती जणांचे बळी घेणार आहे. महामार्ग अधिकारी याच्यावरच गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून शिरवळच्या औद्योगिक वसाहतीत कामासाठी ते कामगार निघाले होते. मालवाहतूक करणार्‍या या टेम्पोत ( केए - 37 / 6037 ) 35पेक्षाही जास्त कामगार दाटीवाटीने बसले होते. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर नेहमीच्या अपघातग्रस्त एस कॉर्नरवर हा भरधाव टेम्पो उलटला. रस्त्याच्या कडेला बांधलेल्या सहा फुटी कठड्यावरून हा टेम्पोफेकला गेला. टेम्पोत बांधकामाचे अवजड साहित्य असल्यामुळे यातील कामगारांना याचा फटका बसला. चार महिला अन् एक मुलगा यांच्यासह सुमारे 18 जण जागीच ठार तर बाकीचे 20 गंभीर जखमी झाले. मृतांमधील सर्वजण मदभावी तांडा नं. 1(विजापुर) येथील रहिवाशी होते. सेंट्रींग व कॉक्रीटीकरणाच्या कामासाठी ते पुण्याकडे येत होते. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांचे तुकडे झाले होते. मृतांमध्ये टेम्पो ची समावेश आहे. या अपघातानंतर घटनास्थळी आक्रोश सुरू झाला. दरम्यान याच टेम्पोच्या पाठीमागून येणार्‍या त्यांच्याच टोळीतील दोघा दुचाकीस्वारांनी तात्काळ ही घटना खंडाळ्याला येऊन पोलिसांना सांगितली. सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय पवार, खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज हांडे अन् त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले. दरम्यान पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली.