Breaking News

मनोरुग्णांसाठी सरसावले सिरोंचातील युवक


गडचिरोली : 
'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' मानून शहरात फिरणाऱ्या मनोरूग्णांची तेलंगाणा राज्यातील अनाथाश्रमात रवानगी करण्यात आली आहे. यापुर्वी मनोरुग्णांची वाढलेली दाढी, कटिंग करुन अंघोळ करुन दिली व त्यांना नवीन वस्त्र देऊन त्यांचा कायापालट केला. अखेर त्या मनोरुग्णांची आज तेलंगाणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील कलवरी अनाथाश्रमात रवानगी करण्यात आली.
माणुसकीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम सिरोंचा युवक, कालेश्वरम येथील एस एस एस संघटना आणि पोलीस उपनिरिक्षक पतंगराव पाटील यांच्या सहकार्याने पार पाडण्यात आला. या उपक्रमात प्रा. रंजित गागापुरवार, नायब तहसीलदार वाघ, पत्रकार सतिश राचर्लावार, दिवाकर तनमनवार, कार्तिक गंगाधारी व एसएस संघटना कलेश्वराचे युवक यांनी सहकार्य केले.
याआधी कालेश्वरम येथे फिरणाऱ्या मनोरूग्णांची या संघटनेने तसेच सिरोंचातील युवकांनी सेवा केली होती. त्यांनासुद्धा अनाथाश्रमात पाठविण्यात आले होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.