एकनाथ खडसे यांची नाशिक एसीबी कार्यालयात पुन्हा हजेरी
नाशिक, दि. 10 एप्रिल - गेली काही वर्षांपासून विविध आरोपांनी हैराण असलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज, मंगळवारी पुन्हा एकदा नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. खडसे यांनी हजेरी का लावली याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र गोपनीय तक्रारीच्या चौकशीचा भाग म्हणून त्यांना बोलावण्यात आल्याची माहिती आहे.
यापूर्वी 20 सप्टेबर 2017 रोजी संध्याकाळी पाच वाजता खडसे अचानक नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजर झाले होते. यादरम्यान, आ.खडसेंची सव्वा तासापेक्षा अधिक वेळ लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये चौकशी झाली होती. त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिका-यांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता. त्यावेळी एसीबीच्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आज, मंगळवारी आ. खडसे यांनी पुन्हा हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.