Breaking News

ई पॉज मशीन कार्यशाळा उत्साहात


पैठण प्रतिनिधी  ;- रेशनवरील धान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील स्वस्त धान्य यंत्रणेच्या व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एईपिडीएस प्रणालीद्वारे ई पॉज मशीन फ्रेन्डली हातळण्याळ्याबाबत चे महत्वपूर्ण प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. बुधवारी {दि.२८} पैठणमध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी मनिषा मेने, तहसीलदार महेश सावंत आदींनी या शिबिरात मार्गदर्शन केले. प्रभारी पुरवठा अधिकारी नानासाहेब फोलाने, सहपुरवठा अधिकारी अब्दुल गफ्फार, नितीन जाधव, संतोष सातपुते, जनार्दन दराडे आदींची यावेळी उपस्थिती होती.