Breaking News

सहा तासांच्या शिफ्टने जीडीपी आणि जीडीएच वाढेल - अनिल बोकील

पुणे, दि. 21, जानेवारी - शासकीय आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या शिफ़्ट आठ तासांऐवजी सहा तासाच्या कराव्यात. जेणेकरून रोजगारनिर्मिती होईल. बेरोजगार युवकांना काम मिळेल. त्यातून सृजशीलता आणि संशोधन प्रकिया वाढेल. कुटुंबियांना वेळ देता येईल. असे झाले तर समाधानी आयुष्य जगता येईल. या सहा तासांच्या शिफ्टमुळे देशाचा जीडीपी आणि जीडीएच दोन्ही झपाट्याने वाढेल, असे प्रतिपादन अर्थक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल बोकील यांनी केले.


एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी, पुणे व भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू परिसरात आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या ‘सकल अंतर्गत उत्पादन (जीडीपी) विरूध्द सकल अंतर्गत समाधान (जीडीएच)’ या विषयावरील चौथ्या सत्रात ते बोलत होते.