विधानभवनात अमरावती जिल्ह्यातील कामांचा आढावा



नागपूर, दि. 4 : मागेल त्याला शेततळे योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असताना शेतकऱ्यांना प्राधान्याने सौरपंपाचे वाटप व्हावे. जेणेकरून सिंचनक्षेत्र आणि कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. सुनील देशमुख, डॉ. अनिल बोंडे, वीरेंद्र जगताप,बच्चू कडू, रमेश बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, विभागीय आयुक्त पियुष सिंह,जिल्हाधिकारी अभिजित बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.