डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रिय विद्यापीठाच्या कुलगूरूपदावर निवड केंद्रिय विद्यापीठाचे कुलगूरूपद भूषवण्याचा मान पहिल्यांदाच मराठवाड्याला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र व जनसंवाद विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. वि. ल.धारूरकर यांची त्रिपुरा केंद्रिय विद्यापीठाच्या कुलगूरू पदावर निवड झाली आहे. एखाद्या केंद्रिय विद्यापीठाचे कुलगूरू होण्याचा मान मिळवणारे डॉ. धारूरकर मराठवाड्यातील पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.
तब्बल 40 वर्षांपासून अध्यापनाच्या क्षेत्रात असणारे डॉ.धारूरकर विद्यापीठ अनुदान आयोगाचे एमिरिट्स प्रोफेसर आहेत. तर आयसीएसएसआरचे सिनीअर प्रोफेसर म्हणूनही त्यांची नियुक्ती आहे. सद्या विद्यापीठातील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स या विभागाच्या संचालक पदावर ते कार्यरत आहेत. देश, विदेशातील चर्चा, परिसंवाद, कार्यशाळांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून. जगभरातील नामांकीत रिसर्च जर्नलमध्ये त्यांचे प्रबंध प्रकाशित झाले आहेत. अध्यापनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी डॉ. धारूरक र यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागातही कार्य केले आहे. डॉ. धारूरकर यांचे विद्यार्थी मराठवाडा आणि महाराष्ट्रासह जगभरात पसरले आहेत. त्यांच्या या नियुक्त ीमुळे विद्यार्थ्यामध्ये चैतन्य निर्माण झाला आहे.