भिवंडीतील इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू

ठाणे, दि. 01 - भिवंडीतील गैबीनगर भागातील दुमजली इमारत रविवारी सकाळी कोसळल्याने इमारतीच्या ढिगार्‍याखाली अडकून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या ढिगार्‍याखाली आणखी काहीजण अडकल्याची शक्यता आहे. 
या इमारतीत आठ ते नऊ कुटुंब रहात होती. घ
टनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. अजून 30 ते 35 जण ढिगार्‍याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. ही इमारत आधीच धोकादायक म्हणून घोषित केली होती. तरीही अन्य पर्याय नसल्याने रहिवाशी जीवाचा धोका पत्करुन या इमारतीत रहात होते.  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाडया दाखल झाल्या आहेत.  परिसर चिंचोळा असल्याने मदतकार्यात अडचणी येत आहेत. जखमींना जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नऊ जखमीपैंकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांना ठाण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. शनिवारी सकाळी गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. बचावपथकाच्या अधिकार्‍यांनी तीन रहिवाशांची  सुखरूपरित्या सुटका केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.