कलाकारांनी चित्रपट महामंडळाचे सभासद व्हावे : नजान


संगमनेर प्रतिनिधी ;- या शहराने नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. या पुढील काळात दर्जेदार चित्रपट येथून निर्माण होतील, अशी आशा आहे. नवोदित कलाकरानी पूर्ण ज्ञान घेऊन या क्षेत्रात यावे. कोणत्याही भूमिकेसाठी अथवा काम मिळण्यासाठी पैसे देऊ नयेत. कुठे फसवणूक झाली तर चित्रपट महामंडळाशी संपर्क साधावा. जास्तीतजास्त कलाकारानी सभासद व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक तथा भरारी पथक जिल्हा प्रमुख शशिकांत नजान यांनी केले. 

येथील रंगकर्मी फिल्म्स प्रस्तुत आगामी ‘७० वर्षानंतर’ आणि ‘आता बास’ या आगामी चित्रपटासाठी कलाकारांची ऑडिशन संगमनेर येथील हॉटेल पंचवटी येथे घेण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, निर्माते डॉ. सोमनाथ मुटकुळे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करण्यात आले. यावेळी रंगकर्मीचे अध्यक्ष अंतून घोडके, वसंत बंदावने, सूर्यकांत शिंदे, डॉ. माधवी देशमुख, मंदा बागुल आदी उपस्थित होते. डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी कॅमेरामन दिनेश सटाणकर, सहाय्यक पंकज देशमुख, अमित शिंदे, प्रा. सुशांत सातपुते, जकीर खान, संदीप रसाळ, सादिक शेख, सुभाष खरबस, सुरेश शिंदे, वैभव पवार, राजन झांबरे, करण चव्हाण आदी उपस्थित होते.