Breaking News

सातारा जिल्ह्यात 1 ते 22 जुलैदरम्यान मोबाईल लोकअदालतीचे आयोजन

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : न्याय आपल्या दारी या नाविन्यपूर्ण संकल्पनेनुसार सातारा जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दि. 1 ते 22 जुलै या कालावधीत मोबाईल ओकअदालत व विधी साक्षरता शिबीर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. यु. देबडवार यांनी दिली.
मोबाईल लोकअदालतीचे कामकाज पॅनेल प्रमुख निवृत्त न्यायाधीश डी. के. राजेपांढरे पाहणार आहेत. लोकन्यायालयाचे कामकाज मोबाईल व्हॅनमध्ये चालणार असून
गावपातळीवरील सर्व व्यक्तींनी आपली प्रलंबित दिवाणी, फौजदारी तसेच वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करावीत. तसेच सर्व बँका, मोबाईल कंपन्या, विद्युत वितरण कंपन्यांची वादपूर्व प्रकरणे यामध्ये सामील करता येतील.
मोबाईल लोकअदालत व विधी साक्षरत शिबीर पुढीलप्रमाणे :- कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथे 1 जुलै रोजी मोबाईल लोक अदालत व 2 जुलै रोजी एकसळ येथे विधी साक्षरता शिबिर, 4 जुलै रोजी खटाव येथे मोबाईल लोकअदालत, 5 जुलै रोजी खटाव येथे विधी साक्षरत शिबीर, 7 जुलै रोजी माण तालुक्यातील बिजवडी येथे मोबाईल लोकअदालत, 8 जुलै वावरहिरे येथे विधी साक्षरत शिबीर, 11 जुलै रोजी माण तालुक्यातील दिवड येथे मोबाईल लोकअदालत, 11 जुलै रोजी पानवण येथे विधी साक्षरत शिबीर, 12 जुलै रोजी फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे मोबाईल लोकअदालत, 13 जुलै रोजी सुरवडी येथे विधी साक्षरता शिबीर, 14 जुलै रोजी खंडाळा तालुक्यातील भादे येथे मोबाईल लोकअदालत, 14 जुलै रोजी भादे येथे विधी साक्षरत शिबीर, 15 जुलै रोजी वाई तालुक्यातील सुरुर येथे मोबाईल लोकअदालत, 16 जुलै रोजी केंजळ येथे विधी साक्षरता शिबीर, 18 जुलै रोजी महाबळेश्‍वर तालुक्यातील पाचगणी येथे मोबाईल लोकअदालत, 18 जुलै रोजी भोसे येथे विधी साक्षरता शिबीर, 19 जुलै रोजी जावली तालुक्यातील कुडाळ येथे मोबाईल लोकअदालत, 19 जुलै रोजी केळघर येथे विधी साक्षरता शिबीर, 20 जुलै रोजी कराड तालुक्यातील कार्वे येथे मोबाईल लोकअदालत, 21 जुलै रोजी गोळेश्‍वर येथे विधी साक्षरता शिबीर, 22 जुलै रोजी पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे मोबाईल लोकअदालत व 22 जुलै रोजी ढेबेवाडी येथे विधी साक्षता शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.