Breaking News

शिवजयंती उत्सवाला आजपासून प्रारंभ भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन सिने अभिनेता अंकुश चौधरी येणार


संगमनेर/प्रतिनिधी ;- शहरात दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला आजपासून {दि.१} प्रारंभ झाला. यानिमित्त सकाळी लहान मुलांच्या चित्रकला व रांगोळी स्पर्धा पार पडल्या. हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. दरम्यान, यानिमित्त चार दिवस विविध प्रकारच्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध सिनेभिनेता अंकुश चौधरी याच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. 

शिवजयंतिंनिमित्त आज मुलांनी छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील विविध प्रसंग अतिशय अभ्यासपूर्णपणे कॅनव्हासवर रेखाटले. शहरात शिवसेना व शिवजयंती उत्सव युवक समिती त्याचबरोबर इतर हिंदुत्ववादी संघटना दरवर्षी एकत्र येऊन तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच उद्या {दि. २} संध्याकाळी ७ वाजता मालपाणी लॉन्स याठिकाणी येथील गौरी अशोक थोरात यांच्या 'साक्षात जिजाऊ' या एकपात्री प्रयोगाचे आयोजन आयोजित आहे. शनिवारी {दि. ३} धर्मवीर संभाजी मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी {दि.४ } होत असलेल्या शिवजयंतीचे मुख्य आकर्षण हे मोटारसायकल रॅली असणार आहे. सिने अभिनेता अंकुश चौधरी हा या रॅलीत भाग घेणार आहे. शिवनेरी गडावरून येणाऱ्या शिवज्योतीचे दुपारी दीड वाजता खांडगाव फाटा याठिकाणी स्वागत होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजेपासून लक्षवेधी पारंपरिक मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. तिथीनुसार साजरी होणाऱ्या या शिवजयंतीला हजारो तरुण कार्यकर्ते पक्ष, संघटना, नाव बाजूला सारून आणि मतभेद छत्रपतींच्या प्रेमापोटी सर्व एकत्र येत दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. यावर्षीच्या मिरवणुकीत शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.