पुस्तकांच्या गावी दिवाळीच्या वाचन फराळाची पर्वणी
मुंबई, दि. 17, नोव्हेंबर - मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावात (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) विविध साहित्यिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन होत आहे. शुक्रवार, 17 ते रविवार, 19 नोव्हेंबर कालावधीत पुस्तकांच्या गावात दिवाळी अंकांचा इतिहास उलगडला जाणार आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, ग्रामस्थ मंडळ, भिलार आणि ग्रंथसखा वाचनालय, बदलापूर, जि.ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांच्या गावात दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक डॉ. आनंद काटीकर व ग्रंथसखा वाचनालयाचे प्रमुख, भाषासंवर्धक श्री. श्याम जोशी यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असे की, यात महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या पहिल्या काळातील (सन 1909) दिवाळी अंकापासून आजपर्यंतचे सुमारे 1000 दिवाळी अंक रसिक-वाचकांनापाहावयास, हाताळावयास आणि वाचावयास मिळणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 17 नोव्हेंबर ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते पुस्तकांच्या गावातील श्री हनुमान मंदिराशेजारील सभागृहात होणार आहे.
वाचनसंस्कृती रुजवणारे दिवाळी अंक आणि पुस्तकांचं गाव (भिलार) हा अभिनव प्रकल्प, यांना जोडून घेऊन या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन होत असल्याने, या प्रदर्शनास व कार्यक्रमास वाचकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आग्रही आवाहन यावेळी श्री. जोशी व डॉ. काटीकर यांनी केले.किमान 60 वर्षे (किंवा त्याहून अधिक वर्षे) सातत्याने दिवाळी अंक प्रकाशित करणार्या संपादकांनी (वरील 12 व्यतिरिक्त) प्रकल्प कार्यालय, पुस्तकांचं गाव, येथे जरुर संपर्क साधावा, असे विनम्र आवाहन डॉ. काटीकर यांनी केले आहे. (दूरध्वनी क्रमांक - 02168-250111 व ई-पत्ता

या प्रदर्शनासोबतच दि. 19 नोव्हेंबर रोजी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ दिवाळी अंक प्रकाशित करणार्या मान्यवर संपादकांचा गौरव ज्येष्ठ विचावंत डॉ. सदानंद मोरे व ज्येष्ठ साहित्यिक श्री. बाबा भांड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. श्रीमती मोनिका गजेंद्रगडकर (मौज), श्री. अशोक कोठावळे (दीपावली), श्री. जयंत मोडक (मुलांचे मासिक), श्रीमती सीमा मराठे (किरात), श्री. विद्याधर ताठे (एकता), श्री. नंदकुमार सापळे (धनुर्धारी), श्रीमती अरुणा अंतरकर (मोहिनी), श्री. आनंद अंतरकर (नवल), श्री. भारतभूषण पाटकर (आवाज), श्रीमती हेमलता अंतरकर (हंस),श्री. हेमंत रायकर (श्रीदीपलक्ष्मी), श्रीमती अनुराधा जोशी (वसुधा) अशा मान्यवर संपादकांचा गौरव करण्यात येणार आहे, अशीही माहिती श्री. जोशी यांनी या प्रसंगी दिली.

Post Comment