दखल - हार्दिकच्या सीडीअस्त्राची भाजपत दहशत
गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेतृत्व करू पाहणारा युवा नेता हार्दिक पटेल याच्या एकांतातील सीडींनी हार्दिक अडचणीत येईल, असे भाजपच्या नेत्यांना वाटत होते. त्यासाठी हार्दिकच्या एकामागून एक सेक्स सीडी व्हायरल करण्यात येत होत्या. त्याचा भाजपशी संबंध नसल्याचं जाहीर करण्यात येत होतं; परंतु एक केंद्रीय मंत्रीच सीडीच्या प्रकाशन समारंभाला हजर होता, यावरून भाजपनंच हार्दिकसह अन्य पाटीदार नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचं षडयंत्र हाती घेतलं होतं, हे उघड झालं.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकीतील पहिली उमेदवार यादी जाहीर करतानाही भाजपनं पाटीदार समाजाची नाराजी वाढू नये, याची दक्षता घेतलेली दिसते. 15 ठिकाणी पाटीदार समाजाच्या लोकांना उमेदवारी देण्यात आली आहे. पाटीदार समाजानं हार्दिकच्या मागं जाऊ नये, हाच प्रयत्न असल्याचं दिसतं; परंतु तेवढ्यावर पाटीदार समाज खूश असेल असं वाटत नाही. भाजपनं ज्या पद्धतीनं हार्दिकच्या सेक्स सीडी व्हायरल केल्या, त्यावरून त्याची बदनामी होण्याऐवजी त्यालाच सहानुभूती मिळत असल्याचा फीडबॅक भाजपच्या नेत्यांपयर्ंत पोचला आहे.
त्यामुळं हार्दिकच्या बाबतीत आणखी 52 सेक्स सीडींचा शिल्लक दारूगोळा वापरायचा, की नाही, याबाबत भाजपमध्येच चलबिचल सुरू झाली आहे. भाजपच्या नाकीनाऊ आणलेल्या हार्दिकला ऐन निवडणुकीच्या तोंडावर घायाळ करण्याच्या हेतूनं त्याच्या आक्षेपार्ह सीडी उघड करण्यात आल्या. या सीडीज उघड झाल्यानंतर हार्दिक जेरबंद होण्याऐवजी अधिकच चवताळून उठला आहे. भाजप निवडणुकीसाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, असं आता युवा व मध्यमवर्गाला वाटायला लागलं आहे.
त्यामुळं त्याला युवा मतदारांची आणि मध्यमवर्गीयांची सहानुभूती मिळत असल्याचा फीडबॅक भाजपला मिळतो आहे. एखादा युवक दुसर्या युवतीशी तिच्या संगनमतानं प्रणय क्रीडा करीत असेल, तर त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. ती त्यांची व्यक्तिगत बाब आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी एका अशाच प्रकरणात निकाल देताना इतरांच्या बेडरुममध्ये डोकावण्याचा अन्यांना अधिकार नाही, असं म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर एकांतात, परस्परसंमतीनं केलेल्या कृतीत गैर काय, असा सवाल विचारला जात आहे.
त्याचबरोबर हार्दिकविरोधात भाजप एवढया खालच्या पातळीवर उतरल्यानं पˆभावशाली पटेल समाजातही त्याचे पडसाद उमटत आहे. अगदी त्याच्याविरोधात असलेल्या पटेल मंडळींचीही सहानुभूूती त्याला मिळते आहे. हार्दिकच्या एकांताच्या अधिकाराचं समर्थन करणारा ट्रेण्डही सामाजिक माध्यमांवर पˆभावी आहे. या सर्वाच दखल भाजपच्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचं समजतं.
गुजरातच्या जनतेला 22 वर्षांच्या मुलाची नव्हे; तर 22 वर्षांत भाजपनं केलेल्या विकासाची सीडी पाहायची आहे, असा टोमणा मारून हार्दिकनं भाजपला आव्हान दिलं आहे. 23 वर्षांचा हार्दिक आता मोठा होतोय. मला बदनाम करण्यासाठी कोटयवधी रुपये खर्च केले जात आहेत; पण मी लढणारा आहे. तुम्हाला काय करायचं ते करा. मी मागं हटणार नाही, अशी आक्रमक भाषा त्यानं वापरलेली आहे. विशेष म्हणजे, त्या सीडीमध्ये आपण नसल्याचा विश्वमित्री पवित्रा घेण्याऐवजी मी मर्द आहे, असं खुलेपणानं त्यानं म्हटलं आहे.
हार्दिकच्या मदतीला दलित समाजाचा युवा नेता जिग्नेश मेवानी हादेखील धावून आला. पिˆय हार्दिक, काळजी करू नकोस. मी तुझ्याबरोबर आहे. तुज्या एकांताचा भंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं म्हणताना माझी सीडी आल्यास जरूर पाहा, अशी उपरोधिक टिप्पणी जिग्नेशनं करून भाजपला एकप्रकारे आव्हान दिलं आहे. स्वतः हार्दिकनं जाहीर केल्यापˆमाणं त्याच्या संदर्भातील आणखी तीन सीडीज कधीही उघड होऊ शकतात; पण हार्दिक अडचणीत येण्याऐवजी त्याच्याबद्दल उमटत असलेल्या सहानुभूतीच्या पˆतिक्रियांनी भाजप द्विधा मनःस्थितीत सापडला आहे. असल्या सेक्स सीडीजचा भाजपला फायदा होणार नाही, अशी टिप्पणी एका वरिष्ठ नेत्यानं अनौपचारिक पातळीवर केली.
हार्दिकनं आता थेट पंतपˆधान नरेंद्र मोद यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. आयुष्यात ज्यांना आपल्या पत्नीला साथ देता आली नाही, ते दुसर्यांच्या सीडी काढताहेत, अशी टीका त्यानं टि्वटरवरून केली आहे. अश्लील सीडी पˆकरणानंतर गुरुवारी रात्री एक टि्वट करून मोदींसह भाजपवर विविध मुद्यांवरून निशाणा साधला आहे. हार्दिकनं टि्वटरवर एक कविता शेअर केली आहे. त्या कवितेमध्ये संघाची स्वातंत्र्य लढयातील अलिप्तता, गांधींची हत्या, हिंदू-मुस्लिम दंगली आणि मोदी आणि त्यांच्या पत्नीमधील संबंध यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
श्रीराम कह गये सिया से
ऐसा कलियुग आयेगा
गोडसे का मंदिर बनेगा
तंबू में राम विराजा जाएगा
मार ना सका एक अंगˆेज को
वो गांधी मार के हिंदू कहलाएगा
जो निभा ना सका पत्नी से
दुसरों की सीडी बनवाएगा
बांटेगा हिंदू को मुस्लिम से
दलित को भी खा जाएगा
गाय को कहकर अपनी मां
उसका मांस तक बेच खाएगा
ऐसा कलियुग आयेगा
गोडसे का मंदिर बनेगा
तंबू में राम विराजा जाएगा
मार ना सका एक अंगˆेज को
वो गांधी मार के हिंदू कहलाएगा
जो निभा ना सका पत्नी से
दुसरों की सीडी बनवाएगा
बांटेगा हिंदू को मुस्लिम से
दलित को भी खा जाएगा
गाय को कहकर अपनी मां
उसका मांस तक बेच खाएगा
या आठवड्यात हार्दिक पटेलच्या सुमारे पाच ते सहा सीडी व्हायरल करण्यात आल्या आहेत.क्लीपपैकी एका क्लीपमध्ये हार्दिक पटेल हा मुंडन आंदोलनामध्ये मुंडन केल्यानंतर मौजमजा करताना दिसत आहे. पाटीदार आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्यांना आदरांजली वाहून गुजरात सरकारचा निषेध करण्यासाठी हार्दिक पटेलसह पाटीदार नेत्यांनी मुंडन केलं होतं.
या सीडींनंतर हार्दिकनं विरोधकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सत्तेत बसलेले लोक दावा करत आहेत, की हा माझा व्हिडीओ आहे; पण माझं म्हणणं आहे की हा बनावट आहे. हा व्हिडीओ माझ्यासारख्या दिसणर्या एखाद्या व्यक्तीचा आहे. हा व्हिडीओ मी परदेशात राहणार्या माझ्या काही ओळखीच्या लोकांना फॉरेन्सिक चाचणी करण्यासाठी पाठवला होता.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ बनावट आहे, असं हार्दिकनं सांगितले आहे. काही वेळासाठी मान्यही केलं की व्हिडीओमधील व्यक्ती मी आहे, तरी मला विचारायचं आहे, की 23 वर्षाच्या तरुणाची गर्लफ्रेंड असू शकत नाही का , असा सवाल त्यानं केला. अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा मी विवाहित नाही; पण ब्रम्हचारी नाही, असं सांगितलं होतं.त्याचा संदर्भ देऊन हार्दिकनं भाजपायींची तोंडं बंद केली आहेत.
एका भाजप आमदारानं चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा पˆयत्न केला; पण त्यावर भाजप काहीच का बोलत नाही, असा त्याचा सवाल आहे. ही लढाई भाजप विरुद्ध काँगˆेस नाही, तर भाजप विरुद्ध हार्दिक आहे, अशा शब्दांत हार्दिकनं भाजपला थेट आव्हान दिलं आहे.
Post Comment