राजावाडी रुग्णालयात मोबाईल, पैसे चोरी करणारा अटकेत

मुंबई, दि. 17, नोव्हेंबर - राजावाडी रुग्णालयातून मोबाईल आणि पैसे चोरी करणा-या चोराला पकडण्यात अखेर पोलिसांना यश मिळाले. संतोष म्हात्रे असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मागील अनेक दिवसांपासून राजावाडी रुग्णालयात चोरांचा सुळसुळाट वाढला होता. मात्र रुग्णालयातील सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चोरांना पकडण्यात पोलिसांना यश मिळत नव्हते. गेल्या महिनाभरात घडलेली चोरीची ही चौथी घटना आहे. काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातील मूलाला चोरुन नेताना एका महिलेला अटक करण्यात आली होती.