फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडील प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सांगली, दि. 18, नोव्हेंबर - महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, सांगली कार्यालयास सन 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये प्रशिक्षण योजनेंतर्गत 200 विद्यार्थ्यांना विविध कोर्सचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
अनुसूचित जातीमधील महार, खाटीक, रूखी, बुरूड, नवबौध्द या सर्व जातीमधील इच्छुक प्रशिक्षणार्थींनी विहीत नमुन्यातील अर्जासाठी जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जुना बुधगाव रोड सांगली, दूरध्वनी क्रमांक 0233-2325659 येथे दिनांक 25 नोव्हेंबर 2017 पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

Post Comment