शरीरसंबंधाला नकार दिल्याने प्रियकराने केले प्रेयसीवर ब्लेडने वार.
शरीर संबंधांना नकार दिला म्हणून त्याने तिच्यावर काल हा हल्ला केला. दादरच्या एका लॉजमध्ये हा प्रकार घडलाय. काल नेहमीप्रमाणे आरती कॉलेजला गेली होती. पण ती घरी परत न येता हॉस्पिटलमध्येच पोहोचली. कालपासून ती शुद्धीवर आलेली नाही. तिच्यावर ब्लेडनं वार करण्यात आले आहेत. तिच्याच परिसरात राहणाऱ्या 20 वर्षांच्या अजमल शाह तिचा प्रियकर होता.