मानुषी छिल्लरला करायचेय आमीर खान सोबत काम.
अलिकडेच विश्वसुंदरी झालेली मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असून बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्यास आवडेल असा प्रश्न तिला विचारण्यात आला असता, तिने मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचे नाव घेतले.
मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर मानुषी छिल्लर नुकतीच भारतात परतली.तिने मुंबईत येऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना “जर मला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर, ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमीर खानसोबत काम करण्यास आवडेल,'' असे ती म्हणाली. बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आवडत असल्याचेही तिने सांगितले.