Breaking News

प्रणव धनावडेच्या नाबाद 1000 धावा


मुंबई, 5 - प्रणव धनावडेने तब्बल नाबाद 1000 धावा ठोकल्या आहे. त्यादेखील केवळ 323 चेंडूमध्ये. तसेच के. सी. गांधी स्कूलनं 1425 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एच. टी. भंडारी आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात प्रणवने ही खेळी केली आहे. प्रणव काल 652 धावांवर नाबाद होता. आज सकाळीच त्याने नऊशे धावांचा टप्पा ओलांडला. क्रिकेट खेळाच्या इतिहासात  ही सर्वोच्च कामगिरी आहे. के.सी. गांधी आणि आर्य गुरुकुल या कल्याणच्याच शाळांमधला सामना कल्याणच्या वायलेनगरच्या मैदानावर सुरू आहे. झीरपर्रीं_ऊहरपरुरवशप्रणवच्या नाबाद 900 धावांच्या खेळीच्या जोरावर के. सी. गांधी स्कूलनं 1150  धावांचा टप्पा गाठला  आहे. त्यामुळे के. सी. गांधी स्कूलची वाटचाल वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने सुरु आहे. के. सी. गांधी स्कूलनं पहिल्या दिवसअखेर एक बाद 956 धावांची मजल मारली होती. प्रणवसोबत सलामीला उतरलेल्या आकाश सिंगनं 173 धावांची, तर सिद्धेश पाटीलनं नाबाद 100 धावांची खेळी केली. प्रणव अजूनही धावपट्टीवर भक्कम पाय रोवून धावांचा पाऊस पाडतोय. मात्र सिद्धेश पाटील 138 धावा करून माघारी परतला. प्रणव आणि सिद्धेशने  दुसर्‍या विकेटसाठी 531 धावांची भागीदारी  रचली. तर त्याआधी प्रणवने आकाशच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 546 धावांची भागीदारी केली.