फेज-2 पाणी योजनेला गती द्या : शिवसेना
अहमदनगर । प्रतिनिधी । 09 - शहर सुधारित पाणी योजनेचे(फेज-2) काम रेंगाळले असून या कामाला त्वरीत गती देवून मुदतवाढीच्या काळात ती पुर्ण करण्यात यावी अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोनल करण्यात येईल, असा इशारा शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
याबाबत मनपा आयुक्त विलास ढगे यांना शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम,माजी महापौर भगवान फुलसौंदर,विरोधी पक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक किशोर डागवाले, विक्रम राठोड,अनिल बोरुडे,सचिन जाधव,डॉ.सागर बोरुडे,योगीराज गाडे,अशोक दहिफळे,सुरेश त्रिपाठी,संतोष गेनप्पा,सचिन शिंदे,ऋषभ भंडारी, शरद कोके आदींनी शिष्टमंडळात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
केंद्र शासनाच्या यु.आर.डी.एस.एस.एम.टी योजनेअंतर्गत शहर पाणी पुरवठा योजना फेज-2 राबविली जात आहे. ही योजना एकून रक्कम रु.116 कोटीची आहे. भविष्यातील 25 वर्षाचा विचार करुन नगरवासियांच्या जिवाळ्याचे विशेषत: महिलांची होणारी पायपीट थांबविणारी अत्यंत महत्वाच्या या योजनेचा दि.21 जून 2010 रोजी कार्यारभ आदेश देण्यात आलेला होता.
परंतु या योजनेचे बरेचसे काम मुदतीत पुर्ण झालेले नाही. शहरातंर्गत वितरण व्यवस्था करण्याचे काम अपुर्ण आहे. त्याप्रमाणे मुळानगर व विळद पंपिंगस्टेशन येथे अद्यापपर्यंत पंपहाऊसचे काम तसेच पाण्याच्या टाक्या बांधल्या परंतु त्या आजपर्यंत सुरु न झाल्याने त्यास तडे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.त्यामुळे या टाक्या वापरता न आल्यास जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ही योजना लवकरात लवकर पुर्ण होणे करिता अधिकारी,पदाधिकारी यांनी प्रयत्न करणे गरजेचे असताना फक्त कागदी घोडे नाचविले जात असून मिटींगची फोर्स केला जात आहे. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देऊनही योजना पुर्णत्वास जाऊ शकली नाही.या योजनेचे महत्व लक्षात घेता ठेकेदारास अंतिम नोटिस देण्यात येवून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी.तसेच सदरील योजना देण्यात आलेल्या मुदत वाढीपर्यंत पुर्ण करणे बाबत तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोनल करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.