Breaking News

दिव्यांग व्यक्तींनी पुणेकरांचे प्रदर्शनातून वेधले लक्ष

पुणे, दि. 24, सप्टेंबर - शहरात दिव्यांग व्यक्तींनी साकारलेल्या वस्तुंचे प्रदर्शन सध्या पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे. खास दिवाळीसाठी आकर्षक आकाशकंदील,  विविधरंगी पणत्या, नक्षीकाम केलेल्या कापडी पिशव्या, सुंदर भेटकार्ड आणि विविध प्रकारच्या फराळाच्या पदार्थापासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत सर्वच गोष्टींना  पुणेकरांनी भरभरुन दाद दिली आहे.
दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणार्‍या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद, सहकार्य निर्माण करण्याचा उद्देश या प्रोत्साहन प्रदर्शनाच्या  माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. एरंडवणा येथील मनोहर मंगल कार्यालयात पुण्यातील एका मैत्रिणींच्या गटाने दिव्यांग व्यक्तींसाठी प्रोत्साहन 2017 प्रदर्शन  भरवले आहे. दिव्यांग व्यक्तींच्या कल्पकतेतून तयार झालेल्या विविध वस्तू माफक दरात याठिकाणी मिळत आहे. या उपक्रमाचे हे पंधरावे वर्ष आहे. विशेष म्हणजे  दिव्यांग मुलींनी पोळी लाटुन, भाजी चिरुनही उपस्थितांना उद्धाटनप्रसंगी दाखविली.