Breaking News

अतिक्रमण धारकांचे बेमुदत उपोषण


बुलडाणा दि 06 - शहरातील अतिक्रमण हटविण्यात आल्याने उदरनिर्वाहाचे साधन गमावून बसलेल्या बेरोजगारा लघुव्यवसायीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतू प्रशासनाकडून दखल न  घेेतल्याने आज पासून लघुव्यवसायाकांनी अमरण उपोषण सूरू केले आहे.
बुलडाणा शहरातील अन्याय ग्रस्त अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नगर पालीका प्रशासनाने हटवून 30 दिवस झाल्यानंतरही लघू व्यवसायीकांना प्रशासनाकडून पर्यायी जागेवर पुनर्वसन करण्याबाबत ठोस पावले उचलली नाहीत. अतिक्रमण धारकांच्या न्याय हक्कासाठी अतिक्रमण धारकांच्या वतीने दि. 28 डिसेंबर 2015 रोजी पासून मा. जिल्हाधिकारी   यांच्या कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरवात करण्यात आली.सदर उपोषणास 7 दिवस उलटूनही चर्चा शिवाय कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे उपोषण कर्त्यांनी दि.04 जानेवारी 2016 उपोषण सूरू केले आहे. या उपोषणात सैयद वसीम सय्यद इकबाल, महेद्रसिंग जगन्नाथसिंग ठाकूर, रविंद्र प्रफुल जाधव, संदिप एकनाथ जैन, किशोर किसन भोपळे, भारत अभिमान गव्हाणे, कडूबा हिम्मतराव पालकर, रवि प्रभाकर सराफ, मनोज बाबुराव देशमुख, सुधाकर रामराव ढोणे सहभागी झाले आहे.