Breaking News

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - पुणे रस्त्यावरील लुधियाना ढाब्याजवळ शिर्डी-औरंगाबाद बसचे स्टेअरिंग लॉक झाले. पण, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ  टळला. हा प्रकार शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडला. एसटी महामंडळाची शिर्डीहून औरंगाबादला जाणारी बस (एम एच 14 बी टी 3824) ही बजाज कंपनीपुढून  गेल्यानंतर अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी बसमध्ये 48 प्रवासी होते. बसचालक गजानन वानखेडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य  ओळखून सर्व प्रवाशांना ओरडून बस फेल झाल्याची सूचना दिली. त्यांनी वेगात असलेल्या बसवर ताबा मिळवत रस्त्याच्या डाव्या बाजुला एका झाडावर बस आदळून  थांबवली.