ग्रामीण रूग्णालयाचा सहाय्यक अधीक्षक लाच घेताना जेरबंद
औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक अधीक्षकाला कर्मचार्याकडून 500 रुपायांची लाच स्विकारतांना औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी(दि.22) रंगेहात पकडले. अनिल गोपिनाथ लोखंडे (57) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पोचोड येथील घराची देखील झाडाझडती घेण्यात आली आहे. पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या एक कर्मचारी हा सरकारी कामानिमित्तच बाहेर गावी गेल्याने तो रुग्णालयात गैरहजर होता. त्या दिवशीचा पगार देण्यासाठी सहाय्यक अधीक्षकाने कर्मचार्याकडून पाचशे रुपयांची लाच मागितली. मात्र, त्या कर्मचार्याने आपण 15 ते 18 मार्च दरम्यान औरंगाबादला राष्ट्रीय किशोरवयीन सुरक्षा शिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे ते गैरहजर राहिले होते, असा खुलासा करत त्या दरम्यानचा पगार देण्याची विनंती लोखंडे यांच्याकडे केली. मात्र त्यासाठी त्याने पाचशे रुपयांची दिले नाही तर त्या दिवशीचा पगार काढणारच नाही, असे सांगीतले. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर शुक्रवारी विभागाने सापळा रचून पाचशे रुपयांची लाच घेताना पकडले.
Post Comment