Breaking News

शास्त्री आणि पंकजा मुुंडे यांच्या वादात वंजारा संघटनेची उडी

औरंगाबाद, दि. 24, सप्टेंबर - भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि महिला बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या वादात आता वंजारा सेवा संघटनेने उडी घेतली  असून भगवानबाबांच्या नावे मिळालेल्या देणग्यांचा हिशोब संघटनेने नामदेव शास्त्री यांना मागितला आहे. त्यांनी दस-यापूर्वी खुलासा करावा, असे आवाहन वंजारी  सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा दसरा मेळावा कृती समितीचे निमंत्रक प्राचार्य डॉ. खुशाल मुंडे यांनी केले.
खुशाल मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत थेट नामदेव शास्त्रींवर तोफ डागली. महंत महागड्या आलिशान गाड्यातून गावोगावी जातात तेव्हा लाखोंच्या देणग्या त्यांना  मिळतात. भगवानगड देवस्थानाच्या माध्यमातून समाजासाठी काही काम व्हावे हा या मागचा उददेश असतो.त्या पैशाचा हिशोब महंतांनी दयावा असे आवाहन  समितीतर्फे करण्यात आले आहे. महंत फक्त पंकजाला विरोध करतात अशी टीकाही करण्यात आली.