Breaking News

रोजगारविषयक सर्व सेवा आता वेबपोर्टलवर

बुलडाणा, दि. 01 -  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय यांनी रोजगारविषयक सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी  www.mahaswayam.in या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/औद्योगिक आस्थापना तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालये यांनी सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वये जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात सादर करावयाची माहिती ऑनलाईन सादर करावयाची आहे. माहे जून 2017 अखेर संपणार्‍या त्रैमासिक ईआर-1 विवरणपत्र संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करून त्याबाबतचे संकेतस्थळावरील प्रमाणपत्र प्राप्त करावे. सदर प्रमाणपत्र या कार्यालयास पाठविण्याची आवश्यकता नाही.
सदर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारिख 30 जुलै 2017 असून त्यानंतर वेबपोर्टलवरील उपरोक्त सुविधा बंद होणार आहे. यामध्ये कसुरदार आस्थापनांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. ऑनलाईन ईआर-1 सादर करण्यात काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाशी अथवा 07262-242342 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक संचालक डी. एल ठाकरे यांनी केले आहे.