Breaking News

शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 01 - बुलडणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटी मेहकरचा सामाजिक उपक्रमांतर्गत मेहकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएमचे उद्घाटन खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणार्‍या शेतकरी बांधवांना अत्यंत अल्पदरात व संपूर्ण दिवसभर शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे तसेच परिसरातील नागरिकांनाही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळावा व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी बुलडाणा अर्बन बँकेच्या वतीने शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरु करण्यात आले. या शुद्ध पिण्याच्या पाण्याचे एटीएमचे उद्घाटन खा.प्रतापवराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बुलडणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर सुकेशजी झंवर, तहसिलदार संतोष काकडे, ठाणेदार मोतीचंद राठोड, बुलडाणा अर्बनचे पालक संचालक किशोर महाजन, गोपाल मोदानी, डॉ.सुभाष सिसोदिया, डॉ.भगवान झंवर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृउबासचे कर्मचारी व बुलडाणा अर्बनचे अभय पावडे, शाखा व्यवस्थापक राजेश बगाडे, मदन मुंदडा आदींसह कर्मचार्‍यांनी प्रयत्न केले.