आयसीटी तंत्रज्ञानाचा वापरणार्या शिक्षकांना राष्ट्रीय पारितोषिक पुरस्कार देण्याचा केंद्राचा निर्णय
सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : शिक्षणामध्ये नावीन्यपूर्ण आयसीटी तंत्रज्ञानाचा वापर करणार्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना राष्ट्रीय पारितोषिक पुरस्कार देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने दि. 31 जुलैपर्यंत संबंधित शाळा, शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेअंतर्गत शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक या कार्यक्रमाचा समावेश केला आहे. त्यानुसार शिक्षणात आयसीटी योजनेचा नावीन्यपूर्ण उपयोग करणार्या शिक्षकांना राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील तीन आयसीटी पुरस्कार निश्चित केले आहेत. या पुरस्कारासाठी दुप्पट म्हणजे 6 नामांकने आयसीटी पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविण्यात येतील. यासाठी केंद्राने काही मार्गदर्शक तत्त्वे ठरविली आहेत. तो शिक्षक मान्यताप्राप्त शाळेचा शिक्षक असावा, तसेच राज्य शासनाच्या शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खासगी अनुदानित शाळा (राज्य मंडळाशी संलग्न) असावा.
प्रत्येक पारितोषिक विजेत्या शिक्षकाला आयसीटी कीट, एक लॅपटॉप व प्रशंसा प्रमाणपत्र असे पारितोषिकांचे स्वरुप असणार आहे. या पारितोषिकांसाठी निवड करण्यासाठी शाळांनी सविस्तर प्रस्ताव विहित नमुन्यात पाठविणे आवश्यक आहे. त्या कागदपत्रांसह शिक्षणाधिकार्यांमार्फत शिक्षण संचालकाकडे प्रस्ताव पाठविणे अनिवार्य आहे. संबंधित शाळा किंवा शिक्षकाने त्यांची नामांकने दि. 31 जुलैपर्यत शिक्षण संचालकांकडे सादर करावीत.
राज्यातून आलेल्या नामांकनाचे नामनिर्देशन करण्यासाठी शालेय प्रधान सचिव, सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे आयुक्त शिक्षण, संचालक माहिती व तंत्रज्ञान विभाग, शिक्षण संचालक (माध्य. वि उच्च माध्य.), शिक्षण संचालक (प्राथ.), राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व आयटी क्षेत्रातील दोन नामांकित तज्ज्ञांचा समावेश आहे.