Breaking News

पालखी सोहळ्यासाठी 968 अधिकारी कर्मचार्‍यांची नेमणूक : संदीप पाटील

सातारा, दि. 24 (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये म्हणून या पालखी सोहळ्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांसह एकूण 968 पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
पालखी सोहळ्यादरम्यान संभाव्य घटनांना सामोरे जाण्यासाठी पुरुष गृहरक्षक 700, महिला गृहरक्षक 200, बॉम्ब शोधक व नाशक 1 पथक, बुलेट प्रुफ वाहन 1 फिरते सीसीटिव्ही व्हॅन या साधनसामग्री पालखी सोहळ्यासाठी तैनात ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये संत ज्ञानेश्‍वर पालखी सोहळा 24 ते 28 जून या कालावधीसाठी कायदा व सुव्यवस्था बंदोबस्तासाठी कर्तव्यावर नेमण्यात आलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, उपपोलीस निरीक्षकांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत असेही पाटील यांनी सांगितले.