Breaking News

विकास कामांमध्ये सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न : श्‍वेताताई महाले पाटील

बुलडाणा, दि. 24 - ग्रामीण भागातील कष्टकरी परंतु उपेक्षित माणसापर्यंत विकासाची गंगा पोहचावी आणि समाजातील शेवटच्या घटकाचा उत्कर्ष व्हावा हे स्वप्न पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी पाहिले होते. त्यांच्या ’ अंत्योदय ’ संकल्पनेनुसार आपण कार्याची दिशा निश्‍चित केली आहे. दलित वस्तीमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करून विकास कामांमध्ये सामाजिक समतोल राखण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन जि. प. सभापती श्‍वेताताई महाले पाटील यांनी केले. गुरूवार, दि. 22 जून रोजी उंद्री येथील दलित वस्तीमधील काँक्रिट रस्त्याच्या भूमीपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
उंद्री येथे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास  करण्याच्या योजनेअंतर्गत डॉ आंबेडकर नगर आणि रमाबाई आंबेडकर नगर या दोन दलित वस्त्यांमध्ये कॉक्रीट रस्त्याचे बांधकाम मंजूर करण्यात आले. प्रत्येकी दोन लाख रूपये किमतीच्या या कामांचे भूमीपूजन  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्‍वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्‍वेताताईंनी ग्रामीण भागातील जनतेच्या प्राधान्याने सोडवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे सांगीतले. रस्ता, वीज, पाणी, रोजगार आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास आपला अग्रक्रम असल्याचे श्रीमती महाले म्हणाल्या. या विकासकामांमध्ये सामाजिक समतोल साधला जावा आणि दलित व उपेक्षित वर्गाचे जीवनमान देखील उंचावावे या साठी आपण येणार्‍या काळात सुध्दा प्रयत्न करू असे आश्‍वासन श्‍वेताताई महाले पाटील यांनी दिले. या वेळी पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र कलंत्री यांनी देखील आपले विचार मांडले. श्‍वेताताईंच्या रूपाने उंद्री जि. प. गटाला कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी मिळाला असून त्यांनी हाती घेतलेल्या विविध विकास कामांमधून या परिसराचा निश्‍चित कायापालट होईल असा विश्‍वास कलंत्री यांनी व्यक्त केला.  सरपंच प्रमिला घनमोडे, माजी भाजपा तालुका अध्यक्ष संजय महाले,प्रल्हाद परसोडे, बंडु बिडवे, रवी शिंदे, मुन्ना नसवाले, नंदू कळसकर, शेख ईब्राहिम, ज्योती भीमराव आंभोरे, शेख रफिक शेख शब्बीर,  मुन्ना कलंत्री, दिनकर राऊत, शेख ईस्माईल, संदीप अंभोरे, रवी बोरकर, विनोद निंबाळकर, विठ्ठल जगताप, नामदेवराव तोंडे, रवी राजपूत, प्रकाश अंभोरे, अरूण गवारगुरू, सुरज अंभोरे,  महादेव घनमोडे, शेजोळ, डि.एस.हिवरकर, श्रीकृष्ण मानकर, नीलेश चिंचोले, डॉ ....... , ग्राम विकास अधिकारी दायमा, शाखा अभियंता झिने तथा ग्रामस्थ या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.