Breaking News

नेपाळमधील सार्क परिषदेकरिता राजेश वाहूरवाघ यांची निवड

बुलडाणा, दि. 24 - आंतररराष्ट्रीय समरसता एवं इंडो-नेपाळ समरसता ऑर्गनॉयझेशन अर्थात सार्क, सांस्कृतिक समन्वय संगोष्ठी परिषद दि. 7, 8, व 9 डिसेंबर 2017 रोजी काठमांडू (नेपाळ) येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेकरिता भारत, भूतान, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदीव या देशातील एकूण 150 सल्लागार सदस्य आमंत्रित आहे. ते आप-आपल्या देशाच्या वैधानिक संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. 
यामध्ये भारत देशाच्या संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी मिशन सल्लागार म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील श्री साई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वैद्य राजेश वाहूरवाघ यांची निवड झाली आहे.  भारत हा प्राचीन काळातील संस्कृतीचा जागतिक गुरू आहे. हाच मोठेपणा कायम ठेवण्यासाठी तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारत हा देश कायम सदस्य होण्याकरिता प्रतिनिधीत्व करीत आहे. भारताची जगातील आठवा शक्तीमान देश म्हणून ओळख आहे. याच कारणास्तव भारत देशाला प्रतिनिधीत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. काठमांडू (नेपाळ) येथे ही परिषद संपन्न होणार आहे. या परिषदेकरिता सहभागी होण्याचे रितसर निमंत्रण पत्रही राजेश वाहूरवाघ यांना नेपाळ सरकारने पाठविले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल बुलडाणा जिल्ह्यासह सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.