अवैध वाळू वाहतूक 14 ट्रकवर कारवाई
पाटण, दि. 24 (प्रतिनिधी) : कोयना भागातील शिरळ व गाढखोप गावच्या हद्दीतून बेकायदेशीररीत्या वाळू व माती वाहतूक करणार्या 14 ट्रकवर महसूल विभागाने धडक कारवाई केली. हे ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पाटण तालुक्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून त्यामुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. संबंधित 14 ट्रकवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तहसीलदार रामहरी भोसले यांनी पाटण पोलिसांना आदेश दिले आहेत.
कराड-चिपळूण राज्य मार्गावरील शिरळ व गाढखोप गावच्या हद्दीतून बेकायदेशीर वाळू व माती वाहतूक करणार्या एमएच 50 एन 6682, एमएच 50-7774, एमएच 50-0999, एमएम 43 वाय 180, एमएच 10 झेड 4611, एमएच 43 वाय 1271, एमएच 09एल 6541, एमएच 12 एचडी 9744, एमएच 04 बीजी 1727, एमएच 10 बीआर 7666, एमएच 10 बीआर 7444, एमएच 10 एडब्ल्यू 1221, एमएच 10 बीआर 9444, एमएच 10 झेड 4843, या 14 ट्रकवर पाटणच्या महसूल विभागाने कारवाई केली. हे ट्रक ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाच्या परिसरात उभे करण्यात आले आहेत. पाटण तालुक्यात वाळू वाहतुकीच्या ट्रकवरील ही सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.
दरम्यान, या ट्रकमालकांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. कायदेशीर कारवाईसाठी ते ट्रक पाटण पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश तहसीलदार रामहरी भोसले यांनी दिले आहेत.