आधुनिक युगात संगणक सारक्षता गरजेची : खबाले

तळमावले, दि. 3 (प्रतिनिधी) : आधुनिक युगात संगणक साक्षरता गरजेची आहे, असे प्रतिपादन जगदंबा उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब खबाले-पाटील यांनी केले. ते नेहरु युवा मंडळ, शांतीनगर या मंडळाच्या अनुसूचित प्रवर्गातील मोफत संगणक प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी वडगावचे सरपंच रणजीत पाटील, दत्तानाना प्रतिष्ठानचे प्रमोद देशमाने, सुपने येथील बलराज पाटील व सुनील पाटील, कविता कचरे, सचिन आचरे, पंजाबराव देसाई, नानासाहेब सावंत, रमेश मोरे, उदयसिंह चव्हाण, कृष्णत मालुसरे, गोविंद गोटूगडे, अधिक करपे, संतोष माने, मारुती गुरव, रमेश शेटे आदी उपस्थित होते.
नेहरु युवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळी सामाजिक बांधलिकी जोपासणारे उपक्रम राबवले जातात. यातून चांगला आदर्श निर्माण होत असल्याचे कविता कचरे म्हणाल्या. याआधी या मंडळाने वृक्षारोपण, वह्या वाटप उपक्रम, उत्सव जयंती साजर्‍या केल्या आहेत.या मंडळाने काळगांव विभागात चांगले काम केले असल्याचे पंजाबराव देसाई यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व लाभार्थी उपस्थित होते. यावेळी पत्रकार पुरस्कार राज्य शासनावतीने दिल्याबाबत संदीप डाकवे व सरकारी वकील नियुक्त झालेबद्दल रणधीर येळवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप डाकवे यांनी सुत्रसंचालन विकास कुराडे यांनी प्रास्ताविक केले व मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत यांनी आभार मानले.