स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ

जालना, दि. 31 - जिल्हा पुरवठा विभाग तसेच दाळमिल ओनर्स असोशिएशन यांच्यातर्फे सुरु करण्यात आलेल्या स्वस्त दरातील तूरदाळ विक्री केंद्राचा शुभारंभ ज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात झाला.
यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, बाजार समितीचे सचिव विष्णुकुमार चेचाणी, संचालक सर्वश्री अनिल सो
नी, रमेश तोतला, गणेश चौगुले, तुळशीराम काळे, श्री मोटे, सुभाष बोडके, श्रीकांतराव घुले, श्री. काजळकर, बाबाजी मोटे, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचपुले, वसंत जगताप, भागवत बावने, सहाय्यक पुरवठा अधिकारी श्री. भारस्कर, तहसीलदार बिपीन पाटील, नायब तहसीलदार गणेश पोलास, नंदकुमार दांडगे, सतीष पंच, शांतीलाल चोरडिया, श्री. भानुशाली, श्री. भाईश्री आदींची उपस्थिती होती.