शिवसेनेबरोबर अखंड महाराष्ट्र हा सर्वच पक्षांचा प्रश्‍न

नाशिक, दि. 31 - वेगळ्या विदर्भाचा विरोध फ़क्त विधानसभेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात करणार असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वेगळ्या विदर्भाचा शिवसेना विरोध करणार. तसेच शिवसेनेबरोबर अखंड महाराष्ट्र हा सर्वच पक्षांचा प्रश्‍न असल्याचे शिवसेना सचिव अनिल देसाई म्हणाले.
शिवसेना भाजपाशी युती नकरता थेट निवडणूक लढूऊ शकतो, आणि सत्ता प्रस्थापित करू शकतो, असा इशारा ही शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी यावेळी दिला. नाशिकमध्ये महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका डोळ्या समोर ठेऊन शिवसेन तयारीला लागल्याचे चित्र दिसून आले, सिडको भागात अभ्यासिका उद्घाटन प्रसंगी शिव
सेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी भाजपाला निशाणा केले.