भोकरदन तालुक्यात दोन गटात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल
वाकडी येथील गजानन राजु लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गजानन राजु लोखंडे व समाधान एकनाथ लोखंडे यांच्यात शेतीचा वाद आहे. सदरील वाद मिटावा यासाठी तुम्ही दिड एकर घेतलेली जमीन आम्हाला परत द्या, असे म्हटल्यानंतर समाधान लोखंडे यांनी लोखंडी फुंकणीने मारहाण करून, गजानन लोखंडे यांचे डोके फोडले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत गजानन राजु लोखंडे यांच्या फिर्यादीवरून समाधान एकनाथ लोखंडे, राजु एकनाथ लोखंडे, संजु एकनाथ लोखंडे, एकनाथ नथु लोखंडे सर्व रा. वाकडी यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
तर समाधान एकनाथ लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आमच्यात शेतीचा वाद चालू आहे. आपसात बोलत असतांना योगेश शंकर लोखंडे व इतरांनी आपणास शिवीगाळ करून, डोके फोडले. तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
याबाबत समाधान लोखंडे यांच्या फिर्यादीवरून योगेश शंकर लोखंडे, दिपक शंकर लोखंडे, गजानन राजु लोखंडे व एक महिला रा. वाकडी ता. भोकरदन यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Post Comment