महिला खातेदारांना नि:शुल्क सातबारा देणार- रुबल अगˆवाल

जळगाव, दि. 31 - महसूल सप्ताहात यावर्षी महिला सक्षमीकरणासाठी उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यानिमित्त या सप्ताहात विविध उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्यात महिला खातेदारांना नि:शुल्क सातबारा देणे, पोलीस दप्तरातील नोंदींच्या आधारे अपघातगˆस्त, पिडीत यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ देणे असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रुबल अगˆवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात सप्ताहभर राबविण्यात येणार्‍या कार्यक्रमांतून महिला सक्षमीकरणासाठी विशेषत्वाने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यातील अभियान अंमलबजावणीचे नियोजन श्रीमती अगˆवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.