Breaking News

पारंपरिक व्यवसायासोबतच आधुनिकतेची कास धरा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नागपूर

कुंभार समाज हा मातीपासून पारंपरिक वस्तू बनवत आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र आता पारंपरिक वस्तुंच्या निर्मितीसोबतच या समाजाने मातीकला बोर्डाच्या माध्यमातूनआधुनिकतेची कास धरावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


राज्य शासनाने वर्धा येथे संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. या निमित्ताने कुंभार समाज महासंघातर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राज्य शासनाचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन शासनाचे अभिनंदन करण्यात आले.


मंचावर माजी मंत्री शोभाताई फडणवीस, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे, प्रदेशाध्यक्ष संजय गाथे, प्रदेश महिला अध्यक्ष रसिका खेडेकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेश लुथेले, सुभाष टेहलवाल, गोपाल बनकर, सुरेश कोथे, चंद्रकला चिकाणे आदी उपस्थित होते.