Breaking News

रिद्धपूर विकास आराखड्यातील कामे लवकरच सुरु होतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस





अमरावती
महानुभाव पंथाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथील विकास आराखड्यातील कामे लवकरच सुरु होऊन गतीने पूर्ण होतील. रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठ स्थापन करण्याबाबतही शासन सकारात्मक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आज कंवरनगर येथील महानुभाव आश्रमाला भेट देऊन महंत कारंजेकर बाबा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे, रवी राणा, महानुभाव प्रचारक मोहन दादा अमृते, महानुभाव परिषद विश्वस्त अविनाश ठाकरे, रिद्धपूरनिवासी वाईनदेशकर बाबा आदी यावेळी उपस्थित होते.