नाशिक परिसरात थंडीची लाट
नाशिक, दि. 28 - नाशिक परिसरात वातावरणात दीड अंशाची घट होऊन नाशिकच्या थंडीचा पारा 8.4 अंशांवर स्थिरावला आहे. तर निफाडमध्ये आतापर्यत निच्चाकी अशा 6.4 अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे थंडीने नाशिककरांना दिवसाही गारठून टाकले आहे.गत आठवडाभरापासून थंडीची तीव्रता अधिकच वाढली आहे. चालू आठवड्यात निफाड येथील कुंदेवाडीत जिल्ह्यातील सर्वात कमी तपमानाची नोंद झाली आहे. कुंदेवाडीत 6.4 अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली, तर मालेगाव येथे 7.2 अंश सेल्सिअस अंश असे तापमान नोंदविले गेले. नाशिकमध्ये 8.4 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली आहे. थंडीमुळे निफाड तालुका गारठून गेला होता.
गहू, कांदा पिकांना पोषक असलेली ही थंडी द्राक्ष पिकाला मात्र हानिकारक असल्याने द्राक्ष उत्पादकांत चिंतेचे वातावरण आहे. वाढलेल्या थंडीमुळे दवबिंदू गारठून जात असल्याचे चित्र जिल्ह्यात निफाड, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, सुरगाणा, कळवण आणि इगतपुरी भागात दिसत आहे. थंडीने नागरिकांना हुडहुडी भरली असली तरी पिकांना मात्र गारठा लाभदायी ठरत आहे. त्यामुळे पिकांवर सर्वाधिक दव जमून त्याचा लाभ पोषणासाठी अन्ननिर्मिती प्रक्रियेला होताना दिसत आहे. दिवसभर कोवळे ऊन राहत असल्याने प्रखरतेचा लवलेश जाणवत नाही.