Breaking News

कुपोषण संपविण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवा - पंकजा मुंडे



नागपूर : कुपोषणाचा समूळ नायनाट करण्यासाठी व भावी पिढी सशक्त बनविण्याकरिता राज्यात पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.

महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई तर्फे सिव्हील लाईन्स परिसरातील हिस्लॉप कॉलेज जवळील चिटणवीस सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.