नक्षली नेत्याला अटक मोठा शस्त्रसाठा जप्त .
जमशेदपूर : झारखंडच्या पूर्व सिंगभूम जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना सुरक्षा जवानांनी नक्षलवाद्यांच्या एका आघाडीच्या नेत्याला ताब्यात घेतले आहे. राजेंद्रसिंग मुंडा ऊर्फ राजू ऊर्फ चंदन असे या नेत्याचे नाव आहे.
यावेळी त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, पाच काडतुसे, एक मॅगजिन, २५ डिटोनेटर्स आणि इतर स्फोटक सामग्री जप्त करण्यात आली. सिंगभूममध्ये झालेल्या अनेक नक्षली हल्ल्यात या नक्षली नेत्याचा हात आहे.