Breaking News

साकुर येथे सर्वधर्मीय मूकमोर्चा

संगमनेर/प्रतिनिधी। कठुआ व उन्नाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात निषेध नोंदविणारा सर्वधर्मीय मूक मोर्चा शनिवारी {दि. २१} संगमनेर तालुक्यातील साकूर येथे काढण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते.

साकूर चौफुलीपासुन या मोर्चाला सुरुवात झाली. आंबेडकरनगर, बाजारपेठेतून जाऊन ग्रामसचिवालयासमोर मोर्चाचा समारोप करताना मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी व्यासपीठावर साकूरचे उपसरपंच व संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष रऊफ शेख, माजी उपसरपंच मुस्लिम जमात ट्रस्टचे अध्यक्ष दादा पटेल, रफिक चौगुले, दादा लोंढे, बाळू कर्डिले, भागा खेमनर, ईस्माईल शाह, कलिम पटेल, आरिफ मोमीन आदी उपस्थित होते.