सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे भोपळा फोड आंदोलन

मुंबई : राज्यातील भाजप सरकारने रोजगार देण्याचे आणि राज्यात उद्योग आणण्याची घोषणा करूनही आश्‍वासनांची पूर्तता केली नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या कार्यक र्त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकार विरोधात घोषणाबाजी करत भोपळा फोड आंदोलन केले. त्यामुळे प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

आज दुपारच्या सुमारास मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी येवून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दरवर्षी बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग आणणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र राज्य सरकारला साडे तीन वर्षे पूर्ण झाली तरी राज्य सरकारने के लेल्या घोषणेची पूर्तता केली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. आंदोलनानंतर मंत्रालयात बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने आंदोलनक र्त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेवून त्यांची रवानगी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात केली.