ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
भुवनेश्वर - भारताने उडिशा किनारपट्टीवर आज ब्राम्होसचा कार्यकाळ वाढवणारी (लाइफ एक्सटेंशन प्रोग्राम) यशस्वी चाचणी घेण्यात आली. क्षेपणास्त्राचा कार्यकाळ 10 ते 15 वर्षांनी वाढवला जाणारे ब्राम्होस हे भारतातील अशा प्रकारचे पहिले क्षेपणास्त्र ठरले आहे. ब्राम्होसची ही चाचणी ओडिसा किनारपट्टीवरील चांदीपूर येथे सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी झाली. क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण मोबाईल लाँचरद्वारे करण्यात आले. संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनीही यासाठी ब्राम्होसच्या टीमचे आणि डिआरडिओचे अभिनंदन केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे, की ब्राम्होसच्या टीमने आणि डीआरडीओने पहिल्यांदाच ब्राम्होसचा कार्यकाळ वाढवणारे तंत्रज्ञान विकसित केले असून त्याची यशस्वी चाचणी केली आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन. या तंत्रज्ञानामुळे भारतीय सुरक्षा दलांचा मोठा खर्च वाचणार असल्याचेही मत यावेळी सितारामन यांनी व्यक्त केले.